आदर्श मुख्यमंत्र्यांना न्यायालयाचा दणका

ashok-chavan
मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळ्या प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना दणका दिला असून आदर्श घोटाळ्यातील आरोपपत्रातून चव्हाण यांचे नाव वगळण्याची सीबीआयची याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्याने चव्हाण यांच्या अडचणीत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.

सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात आदर्श घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव आरोपपत्रातून वगळण्यात यावे अशी विनंती करणारी याचिका दाखल केली होती. चव्हाण यांच्या विरोधात पुरेसे पुरावे नसल्याचे सांगत राज्यपालांनी त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्याची परवानगी नाकारली होती. यासंदर्भात सीबीआयच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने चव्हाण यांचे नाव वगळण्यास नकार दिला.

Leave a Comment