१५ दिवसांनंतर होणार सुरू केईएमचे आयसीयू

kem
मुंबई – मुंबईतील ख्यातनाम असलेल्या केईएम रुग्णालयातील अतिदक्षता विभागाचे (आयसीयू) उद्घाटन झाले असले तरी प्रत्यक्ष सेवा सुरू होण्यासाठी १५ दिवस वाट पाहावी लागणार आहे. या विभागात अत्याधुनिक सुविधांसह चार शस्त्रक्रिया विभागही आहेत. निर्जंतुकीकरण झाल्याशिवाय हा विभाग सुरू करता येणार नाही, अशी माहिती अधिष्ठात्या शुभांगी पारकर यांनी दिली. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात ७८ खाटा आहेत. केईएममधील अतिदक्षता विभाग हा सर्वाधिक खाटा असलेला देशातील पहिला विभाग आहे. त्यात शस्त्रक्रिया विभागही आहेत. त्यामुळे या विभागात निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे, असे डॉ. पारकर यांनी सांगितले. रुग्णालयात संसर्ग समितीही (इन्फेक्शन कमिटी) आहे. ती या विभागातील निर्जंतुकीकरणाची चाचणी काही दिवस करील. हा विभाग निर्जंतुक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विभागातील काम सुरू करण्यात येणार आहे, असे डॉ. पारकर यांनी सांगितले. उद्घाटन सोहळ्यासाठी हा विभाग सज्ज करण्यात आला असून लवकरच या विभागात आवश्यक यंत्रसामग्री बसवण्यात येणार आहे. त्याला काही दिवस लागतील. त्यामुळे १५ दिवसांनंतरच काम सुरू होईल.

Leave a Comment