८०० रुपयांनी वाढले सोने

gold
नवी दिल्ली- सोन्याच्या भावामध्ये या वर्षामध्ये सर्वात मोठय़ा वाढीची नोंद शनिवारी येथील सराफा बाजारामध्ये झाली. सोन्याचे भाव ७१५ रुपयांनी वधारून २६,८५० रुपये प्रति तोळा बंद झाले. लग्नसराईतील खरेदी आणि जागतिक बाजारातील भाववाढीने सोन्याला नवी झळाळी प्राप्त झाल्याचे बाजारातील तज्ज्ञांनी सांगितले.

आतंरराष्ट्रीय बाजारात डॉलरसमोर रुपयाचे सुरू असलेल्या अवमूलनामुळे सोन्याची आयातही महागली असून यामुळेही हा मूल्यवान धातू महागण्यास हातभार लागला. शुक्रवारी रुपया डॉलरसमोर ६१.७२ वर बंद झाला. ही रुपयाची महिनाभराची नीचांकी पातळी ठरली. चांदीची चमकही वाढली असून या धातूचे भाव २१०० रुपयांनी वधारले. दिवसअखेर हा भाव प्रतिकिलो ३६,७०० रुपयांवर गेला.

Leave a Comment