चायना ओपनच्या अंतिम फेरीत सायना

saina
फुझहोउ – चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालने जागतिक क्रमवारीत १७ व्या स्थानावर असलेल्या चीनच्या लियू झिनचा २१-१७, २१-१७ असा सरळ सेटमध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली.जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असणाऱ्या सायनाची अंतिम लढत बाई येऑन ज्यू आणि अकाने यामगुची यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.

तत्पूर्वी आजचा सामना सुरु झाल्यानंतर पहिल्या सेटमध्ये लियूकडे तीन गुणांची आघाडी होती. मात्र सायनाने ही पिछाडी भरुन काढत सहज सेट जिंकला. त्यानंतर दुस-या सेटमध्येही लियूने तीन गुणांची आघाडी घेतली होती. मात्र सायनाने पिछाडी भरुन काढली आणि अंतिम फेरीत स्थान निश्चित केले.

Leave a Comment