सचिन पाडवेला अवघ्या ३०० रुपयांचे बक्षिस

padave
रत्नागिरी : कोकण कन्या एक्स्प्रेसचा अपघात ज्या सचिन पाडवेमुळे टळला त्याला कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केवळ ३०० रूपये देऊन असंवेदनशीलतेचा परिचय दिला असून त्याचबरोबर अधिकाऱ्यांची परवानगी न घेता प्रसार माध्यमांना या घटनेची माहिती दिल्यामुळे पाडवेला दम भरण्यात आला आहे.

सचिन पाडवे स्वतःचा जीव धोक्यात घालून तीन दिवसांपूर्वी शेकडो मीटर धाव घेऊन कोकणकन्या एक्स्प्रेस वेळेत रोखल्यामुळे हजारो प्रवाशांचे प्राण वाचले. पण कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पाडवेंचे कौतुक करायचे तर दूरच राहिले पण उलट त्यांना चार शब्द सुनावले. असे असले तरी रत्नागिरीतल्या राजकीय कार्यकर्त्यांनी मात्र पाडवेंवर कौतुकाचा वर्षाव सुरू केला आहे. रत्नागिरी, राजापूरचे आमदार आणि मनसेचे पदाधिकाऱी पाडवेंच्या घरी जाऊन आले. खासदार विनायक राऊतांना त्यांची कामगिरी रेल्वेमंत्र्यांपर्यंत पोहचवली आहे. पण हे कौतुक करताना कोकण रेल्वेच्या सुरक्षिततेवरून कार्यकर्ते आंदोलनाचा इशाराही देत आहेत.

Leave a Comment