
दुबई – शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) वार्षिक क्रीडा पुरस्कार जाहीर केले असून यामध्ये आयसीसीचा वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज मिशेल जॉन्सन याला मिळाला आहे.
मिशेल जॉन्सनला वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार
मिशेल जॉन्सन याला सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूसह (सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी) सर्वोत्कृष्ट कसोटीपटू असे दोन महत्त्वपूर्ण पुरस्कार मिळाले आहेत. आपल्या कारकिर्दीत जॉन्सनने दुस-यांदा हा पुरस्कार मिळवला असून यापूर्वी त्याला २००९ मध्ये हा पुरस्कार मिळाला होता.
