भारताच्या नकाशातून काश्मीरच गायब

modi1
ब्रिस्बेन- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड तंत्रज्ञान विद्यापीठाला दिलेल्या भेटीच्या दरम्यान भारताचा चुकीचा नकाशा प्रदर्शित करण्यात आला. या नकाशातून काश्मीर राज्य गायब झाल्याने खळबळ माजली. या घटनेचा भारताने तात्काळ निषेध नोंदवला.

क्वीन्सलँड तंत्रज्ञान विद्यापीठाला पंतप्रधान मोदींनी आज भेट दिली. त्यावेळी तेथे भारताचा नकाशा लावला होता. त्यातून काश्मीर गायब होते. ही बाब उघडकीस येताच परराष्ट्र सचिव सुजाता सिंह यांनी या घटनेचा निषेध करून बिनशर्त माफी मागण्यास सांगितले, अशी माहिती परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी दिली. यासंदर्भात नंतर आयोजकांनी दिलगिरी व्यक्त केल्याचे अकबरुद्दीन यांनी सांगितले.