डेंग्यूमुळे नगरसेविकेच्या पतीचा मृत्यू

dengue
नाशिक – डेंग्यूमुळे गुरुवारी रात्री नाशिकमधील मनसेच्या नगरसेविका अर्चना जाधव यांचे पती संजय जाधव(४६) यांचा मृत्यू झाला.

संजय हे गेल्या काही दिवसांपासून सर्दी आणि तापामुळे आजारी होते. त्यांच्यावर ऋषिकेश रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. अखेर गुरुवारी रात्री त्यांचा मृत्यू झाल्याचे ऋषिकेश रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर बाफना यांनी सांगितले.

जाधव यांच्या शरीरात डेग्यूंची लक्षणे दिसून येत होती. मात्र त्याबाबतचा वैद्यकीय अहवाल अद्याप आलेला नाही. संजय यांच्या रक्ताचे नमुने परीक्षणासाठी पाठवण्यात आले आहेत असे बाफना पुढे म्हणाले. आज सकाळी संजय याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरमितसिंग बग्गा, मनसेचे नगरसेवक, नाशिक महानगरपालिकेतील अधिकारी आणि नातेवाईक उपस्थित होते.

Leave a Comment