‘पृथ्वी २’ची यशस्वी चाचणी

prithvi
बालासोर (ओदिशा) – आज जमिनीवरुन जमिनीवर मारा करणा-या स्वदेशी बनावटीच्या ‘पृथ्वी २’ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

ही चाचणी बालासोर येथील चांदीपूर परीक्षण तळावरुन घेण्यात आली. सकाळी नऊ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण झाल्याची माहिती प्रक्षेपण केंद्राचे संचालक एम.के.व्ही.के प्रसाद यांनी दिली. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ३५० किलोमीटर इतकी आहे. ही चाचणी लष्कराच्या नियमित सराव चाचणीचा एक भाग होता. डीआरडीओच्या शास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली ही चाचणी पार पडली.

पृथ्वी २ हे डीआरडीओने विकसित केलेले पहिले स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र आहे. सुमारे ५०० ते १०० किग्रॅ स्फोटके वाहून नेण्याची या क्षेपाणास्त्राची क्षमता आहे. २००३ मध्ये पृथ्वीचा सैन्य दलात समावेश करण्यात आला आहे. याआधी सात जानेवारी २०१४ मध्ये या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी पार पडली होती.

Leave a Comment