
लावाने आयरिस सेल्फी ५० स्मार्टफोन नुकताच लाँच केला असून त्याची किंमत आहे ७९९९ रूपये. कंपनीच्या वेबवाईटवर ही माहिती दिली गेली आहे मात्र रिटेल बाजारात किंवा ऑनलाईन विक्रीसाठी हा फोन कधी उपलब्ध होणार यासंबंधीची माहिती दिली गेलेली नाही.
लावाने आणला आयरिस सेल्फी ५० स्मार्टफोन
या सेल्फी स्मार्टफोनची वैशिष्ट्ये म्हणजे याला ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा एलइडी फ्लॅशसह दिला गेला आहे. कमी प्रकाशातही चांगली सेल्फी काढता येईल अशा पद्धतीने याचे डिझाईन करण्यात आले आहे. अँड्राईड किटकॅट ४.४.२ ऑपरेटिंग सिस्टीम, ड्यूअल सिम पैकी एक रेग्युलर तर दुसरे मायक्रो, ५ इंची डिस्प्ले, ८ जीबी इंटरनल मेमरी, ३२ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा, ८ एमपीचा फ्लॅशसह रियर कॅमेरा अशी त्याची अन्य फिचर्स आहेत. थ्रीजी, जीपीआरएस, वायफाय, मायक्रो यूएसबी, ब्ल्यू टूथ कनेक्टीव्हीटी दिली गेली असून १० तास टॉकटाइम व २०० तास स्टॅडबाय टाईमची बॅटरी फोनमध्ये आहे.
