येथे चिमण्या करतात आत्महत्या

chimanya
दक्षिण आसाममधील दिमा हासो जिल्ह्यातील जंतंगा हे छोटेसे सुंदर आदिवासी गाव कांही काळ पर्यटकांच्या पसंतीचे गांव होते. मात्र वर्षातील सुमारे नऊ महिने अन्य जगापासून दूर असणार्‍ या या गावाची ओळख आता चिमण्यांचे आत्महत्या करण्याचे ठिकाण अशी झाली आहे. प्टेंबरपासून ते नोव्हेंबर पर्यंत या गावात आजकाल पर्यटक येतातच पण जादा गर्दी असते की पक्षी तज्ञ, शास्त्रज्ञ, संशोधक, पत्रकारांची.

बरेल पर्वत श्रेणीत येणार्‍या यागावांत आक्टोबर नोव्हेंबरच्या कृष्णपक्षात रात्रीत ७ ते १० -११ पर्यंत चिमण्या आत्महत्या करतात. या काळात हवा वादळी असेल, आकाश ढगाळ असेल आणि अशावेळी कुठूनही प्रकाशाची तिरीप आली की त्या उजेडावर चिमण्या पतंगाप्रमाणे झेप घेतात असे सांगितले जाते. अशा प्रकारे आत्महत्त्या करणार्‍यात ३ डझन वेगवेगळ्या प्रजातीच्या चिमण्या असतात. विशेष म्हणजे याच भागात २४ हून अधिक आदिवासी जमातीही राहातात.

या आत्महत्त्येसंदर्भात अनेक कथा सांगितल्या जातात. या भागात बहुतेक लोक शेती उद्योग करतात. त्यांच्या समजाप्रमाणे या काळात वाईट आत्मे चिमण्यांच्या रूपात येऊन आगीत पडतात. त्यामुळे या काळात येथे चिमण्या मारण्याची जणू स्पर्धाच लागते. जो जास्त चिमण्या मारेल त्याला समाजात प्रतिष्ठा मिळते. पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली, डॉ.सेनगुप्ता, रॉबिन बॅनर्जी यांनीही या भागाला अनेकवार भेट देऊन हा प्रकार काय असावा याचा तपास घेतला आहे मात्र कोणताही निष्कर्ष त्यातून काढता आलेला नाही.

जिऑलॉजीकल सर्वे ऑफ इंडियाने डॉ. सेनगुप्ता यांच्या नेतृत्त्याखाली येथे तपास केला होता. त्यातून विशिष्ट काळात येथील जमिनीच्या चुंबकत्वात बदल होतो व त्यामुळे चिमण्यांचे शारीरिक संतुलन बिघडते व त्यातून त्या प्रकाशाकडे धाव घेतात असा अंदाज काढला गेला होता मात्र त्याला बळकट पुरावा मिळालेला नाही. १९८० च्या दशकात येथे पर्यटक मोठ्या संख्येने येत असत मात्र उग्रवादींच्या प्रभावामुळे ही संख्या रोडावत गेल्याचे सांगितले जाते

Leave a Comment