पाक फलंदाज अहमदच्या डोक्याला बाउन्सरमुळे फ्रॅक्चर

shajjad
किवी बॉलर कोरी अंडरसन याच्या एका बाऊन्सरमुळे पाकचा स्टार फलंदाज अहमद शहजाद याच्या डोक्याला फ्रॅक्चर झाले असून त्याला अतिदक्षता विभागात हलविले गेले आहे. अंडरसनचा बॉल अहमदच्या डोक्याला लागल्यानंतर तो खेळपट्टीवर कोसळला व त्याची बॅट विकेटवर पडली. त्यामुळे त्याला हिट विकेट म्हणून बाद करण्यात आले. त्यापूर्वी अहमदने १७६ रन्स केल्या होत्या. १५० पेक्षा अधिक रन्स काढून हिट विकेट होण्याचे रेकॉर्ड त्याने प्रस्थापित केले आहे. हे रेकॉर्ड नोंदविणारा तो पहिला आशियाई ठरला आहे.

१५० पेक्षा अधिक रन काढून हिट विकेट होणारा अहमद हा ६ वा बॅटसमन आहे. बॉलमुळे त्याच्या डोक्याला फ्रॅक्चर झाले असल्याने त्याला अतिदक्षता विभागात ठेवले गेले आहे. दोन दिवसांत त्याचे दुखणे कमी झाले नाही तर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे पाकचा मॅनेजर मोईनखान याने सांगितले. अहमद शहजाद ने ३७१ चेंडूत १७ चौकार आणि १ षटकारासह १७६ रन्स केल्या आहेत.

यापूर्वी १५० पेक्षा अधिक रन्स काढून हिट विकेट झालेल्यात ऑस्ट्रेलियाचा विल पोन्सफोर्ड दोन वेळा बाद झाला आहे. ब्रॅडमन, वेस्ट इंडिजचा बाचूस व इंग्लंडचे जॅक हॉब्ज व डेनिस कॉम्पटन हे अन्य खेळाडू आहेत.

Leave a Comment