हेल्मेट न घालणाऱ्या पुणेकरांना पोलिसांचा दणका

traffic-polce
पुणे : वाहतूक पोलिस आयुक्तांनी हेल्मेट न घालणाऱ्या पुणेकरांना दणका देण्यास सुरुवात केली असून हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणाऱ्यांवर चौकाचौकात दंडवसुली सुरु केली आहे.

काही वर्षांपूर्वी हेल्मेट सक्तीचा प्रयत्न पुण्यात झाला होता. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आणि हेल्मेट सक्ती लागू करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र यावर अंमलबजावणी झालीच नाही. शहरात कायमस्वरुपी हेल्मेट वापरणे शक्य नसल्याचे कारण यासाठी पुढे करण्यात येत आहे.

पण गेल्या काही दिवसांपासून पुणे वाहतूक पोलिसांनी पुन्हा हेल्मेट सक्तीची मोहीम सुरु केली असून पुण्यातील विविध संघटना या मोहीमेला विरोध करत आहेत. शहरात वाहतुकीची समस्या जटील असल्याने हेल्मेट सक्ती होऊच शकत नाही, असा पुणेकरांचा दावा आहे.

Leave a Comment