आता ‘इंस्टाग्राम’वर देखील मोदी

modi1
नाय पाइ ताऔ – सोशल मीडियातील फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वसामान्यांशी संपर्कात असतात. म्यानमार येथे होऊ घातलेल्या १२व्या आशियान शिखर परिषदेसाठी नरेंद्र मोदी गेले असून तेथे ते ‘इंस्टाग्राम’ सोशल नेटवर्किंग वेबसाइटवर दाखल झाले आहेत. मोदींनी या परिषदेचा फोटो ‘इंस्टाग्राम’वर टाकला आहे.

या फोटो सोबत त्यांनी “Hello World! Great being on Instagram. My first photo…this one from the ASEAN Summit, @Nay Pyi Taw,” असा संदेश सुद्धा लिहला आहे.

‘इंस्टाग्राम’ प्रसिद्ध केलेला फोटो मोदींनी स्वतः काढला असून ‘इंस्टाग्राम’वर त्यांना सध्या ६० हजारहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. नेटिझन्सनी मोदींचे ‘इंस्टाग्राम’वर जारोदार स्वागत केले आहे.

Leave a Comment