प्रवीण कुमारला घातला भामट्यांनी गंडा

pravin-kumar
नागपूर – भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज प्रवीणकुमार याची २५ तोळ्यांची सोनसाखळी चोरीला गेली. व्हीसीएच्या सिव्हिल लाईन्समधील ड्रेसिंग रूमजवळ घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सदर पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नागपुरच्या व्हीसीए मैदानावर उत्तर प्रदेश विरूद्ध राजस्थान या मॅचसाठी प्रवीण कुमार नागपुरला आला आहे. मॅचचा सराव करताना त्याने आपली चेन काढून ठेवली होती. प्रॅक्टिसनंतर तो परतला तेव्हा त्याला सोनसाखळी सापडली नाही. प्रवीण कुमारने सदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून ही सोनसाखळी २५ तोळ्यांची असून तब्बल आठ लाख किमतीची होती.

याप्रकरणामुळे पुन्हा एकदा नागपूरच्या रस्त्यांवर होत असलेल्या चेन स्नॅचिंग आणि चोरीच्या घटनांना पुन्हा वाटा फुटली आहे. यापूर्वी क्रिकेटपटू राहुल द्रविडच्या सासूबाईंचे मंगळसूत्र भर रस्त्यात चोरीला गेले होते.