आत्मघाती हल्ल्यात शाळेतील ७८ विद्यार्थ्यांचा मृत्यू

attack
पोतिस्कम – उत्तर-पूर्व नाइजीरियामधील एका शाळेचा गनवेश घालून एका आत्मघाती हल्लेखोराने स्वतःला बॉम्ब लावून स्फोट केला आहे. त्यामुळे ७८ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून ४५ अन्य विद्यार्थी जखमी झाले आहे. हा हल्ला सोमवारी करण्यात आला. मात्र, या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही.

नायजेरियन सुरक्षा दलांनी हल्ल्याची कार्यपद्धती पाहता हा हल्ला ‘बोको हराम’नेच केला असल्याचा दावा केला आहे. यापूर्वीही ‘बोको हराम’ने नायजेरियातील २०० विद्यार्थिनींचे अपहरण केले होते. अद्यापही त्यांची सुखरूप सुटका झालेली नसताना या दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा शालेय विद्यार्थांना लक्ष्य केले आहे. आत्मघातकी हल्ल्या ठार झालेले विद्यार्थी १० ते २० वर्ष वयोगटातील असल्याचे समजते.

Leave a Comment