भारतीय रेल्वेच्या उत्पन्नामध्ये १२ टक्क्यांची वाढ

indian-rail
नवी दिल्ली – भारतीय रेल्वेला देखील ‘अच्छे दिन…’ची चाहूल लागली असून एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीत रेल्वेच्या उत्पन्नात १२ टक्क्यांची वाढ झाली असून या कालावधीत रेल्वेने ८६,५९५.०४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. मागील वर्षी रेल्वेने याच महिन्यांच्या दरम्यान ७७२,७३.८८ करोड कमाई केली होती. त्याचप्रमाणे मालवाहतुकीत ही ५७६,४६.६८ करोड रूपये कमविले असून मागील वर्षी याच महिन्यांच्या दरम्यान ५१८,७७.९८ करोड रुपये होती. ज्यामुळे मागील वर्षांपेक्षा यात ११.१२ टक्के वाढ झाली आहे.

त्याचप्रमाणे एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीत प्रवासी भाड्यात देखील २४७,१६.९७ करोड कमाई केली असून त्यात देखील १६.३३ टक्क्यांची वाढ झाली आहे.

Leave a Comment