विदर्भातही येणार डेक्कन ओडीसी – सुधीर मुनगंटीवार

deccan
नागपूर – राज्याचे नवनियुक्त अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कालपर्यंत केवळ काही भागापुरतीच मर्यादित राहिलेली डेक्कन ओडीसी रेल्वे येत्या काळात विदर्भात आणण्याची व त्यातून देशविदेशातील पर्यटकांना या परिसरातल्या समृद्ध वन व निसर्गसंपदेचे दर्शन घडवीत येथील वनपर्यटन अधिक विकसित करण्याची घोषणा केली आहे.

मुनगंटीवार पत्रकारांशी नागपुरातील भाजपा कार्यालयात बोलत होते. यावेळी अर्थमंत्री या नात्याने बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी सध्याच्या कर्ज आणि कर्जाच्या परतफेडीच्या दुष्टचक्रातून महाराष्ट्राला बाहेर काढण्याचा निर्धार व्यक्त केला. आज महाराष्ट्रावर सुमारे तीन लक्ष कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्याच्या नुसत्या व्याजापोटी वर्षाला तेवीस हजार कोटी रुपयांचा भरणा करावा लागतो. या कर्ज आणि त्याच्या परतफेडीच्या चक्रात अडकल्याने राज्याच्या विकासाला गती देता येत नाही. म्हणूनच सध्याच्या स्थितीची श्‍वेतपत्रिका काढण्याला तर सरकारचे प्राधान्य राहीलच पण, येत्या काळात या परिस्थितीतून राज्याला बाहेर काढत विकास कामांची दशा बदलवित त्याला योग्य दिशा देण्याचे काम केले जाणार आहे. राज्यातील रखडलेल्या प्रकल्पांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्याचा मानसही वित्तमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Comment