काबूलचे पोलिस प्रमुख झहीर यांच्या कार्यालयात बॉम्बस्फोट

bomb
काबूल – काबूलचे पोलिस प्रमुख झहीर यांच्या कार्यालयात स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. मात्र या स्फोटात झहीर यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याचे अधिका-यांनी सांगितले.

तालिबानने या स्फोटाची जबाबदारी घेतल्याचे ट्वीटरवरून जाहीर केले आहे. आत्मघातकी बॉम्बचा वापर या स्फोटात करण्यात आला होता. या स्फोटाप्रकरणी सविस्तर माहिती लगेचच देता येणार नाही, असे पोलिसांचे उप प्रवक्ते नजीब दानिश यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment