प्रवाशांचा देवदूत बनला ट्रॅकमन

konkan-railway
रत्नागिरी – पुन्हा एकदा कोकण रेल्वेमार्ग किती असुरक्षित आहे याचा अनुभव आला. मात्र कोकणकन्या एक्सप्रेसचा संभाव्य भीषण अपघात ट्रॅकमन सचिन पाडावे याच्या प्रसंगावधानामुळे टळला. लाजूळ येथे रेल्वे रुळ तुटला होता. ट्रॅकमन पाडावे यांना हा प्रकार दिसून आल्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता रेल्वे कंट्रोल रुमसह उक्षी रेल्वे स्थानक मास्तरला ही माहिती दिली. त्याचबरोबर त्यांनी उक्षी रेल्वे स्थानकाच्या दिशेने सुमारे २०० मीटर अंतर धावत जाऊन लाजूळच्या दिशेने येणार्‍या कोकण एक्सप्रेसला आपल्याकडील बॅटरीचा रेड सिग्नल देऊन गाडी थांबवली. त्यामुळे एक मोठा अपघात टळला आहे. या घटनेनंतर कोकण रेल्वेचा वेग कमी करण्यात आला असून, मार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. ट्रॅकमन सचिन पाडावे यांनी सतर्कता दाखवून कोकणकन्या एक्सप्रेस थांबवली नसती तर रेल्वे पुलावरुन कोसळून मोठा अपघात होण्याचा धोका होता.

Leave a Comment