‘मदर तेरेसा पुरस्कार’ डॉ. प्रकाश आमटे यांना जाहीर

amte
मुंबई – बाबा आमटे यांच्या कार्याचा वारसा पुढे चालवणारे ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे आणि नेपाळच्या सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा कोईराला यांच्यासह १० जणांना हार्मोनी संस्थेचा सामाजिक न्यायासाठी दिला जाणारा प्रतिष्ठित ‘मदर तेरेसा आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

हेमलकसा या दुर्गम ठिकाणी आदिवासींसाठी डॉ. प्रकाश आमटे यांनी पत्नी मंदाकिनी आमटे यांच्यासोबत केलेल्या कार्यांची ओळख सर्वांनाच आहे. त्यांच्या या समाजकार्याचा गौरव म्हणून हार्मोनी संस्थेच्या या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.

त्यासोबतच अनुराधा कोईराला यांची मानवी तस्करीच्या जाळ्यातून सुमारे १२ हजार महिलांची सुटका केल्याबद्दल पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. गेल्या दोन दशकांपासून नेपाळ-भारत सीमेवर सुरु असलेल्या मानवी तस्करीविरोधात त्यांचा लढा सुरु आहे.

ईशान्य भारतात व्यसनमुक्तीसाठी केलेल्या कार्याबद्दल ऐझवाल येथील डॉ. संगथनकिमा यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच लक्ष्मीधर मिश्रा, सुनिथा कृष्णन, वंदना शिवा, रिफत अब्दुल्ला यांचीही या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

Leave a Comment