
सोची (रशिया) – आजपासून सुरू होणा-या जगज्जेतेपदाच्या लढतीत जगज्जेता नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनशी माजी जगज्जेता आणि आव्हानवीर विश्वनाथन आनंद दोन हात करेल. कार्लसनने गेल्या वर्षी चेन्नई येथे आनंदला नमवत जगज्जेतापदावर आपले नाव कोरले होते. आता त्या पराभवाची परतफेड करत आनंद कारकीर्दीतील सहावे जगज्जेतेपद पटकवतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
आज कार्लसनशी दोन हात करणार आनंद
गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्याअखेर बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीत त्यावेळचा जगज्जेता भारताचा विश्वनाथन आनंद आव्हानवीर नॉर्वेचा मॅग्नस कार्लसनशी ३.५-६.५ असा पराभूत झाला, त्यावेळी त्याच्या परमभक्तांनीही वर्षभरानंतरच्या नोव्हेंबर महिन्यात तोच आनंद त्याच कार्लसनशी पुन्हा जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी उभा राहील, असे भाकीत केले नव्हते.
