विशेष दर्जाच्या अधिकाऱ्याला शिवसेनेचा विरोध

rahul-shewale
मुंबई – शिवसेनेचे खासदार राहूल शेवाळे यांनी मुंबईच्या विकासासाठी विशेष दर्जाचा अधिकारी नेमण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाला विरोध दर्शविला असून मुंबईला देखील महाराष्ट्रापासून वेगळा करण्याचाचा हा डाव असून, मुख्यमंत्र्यांना आत्मविश्वास नसल्याची टिका शेवाळे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या विकासासाठी विशेष दर्जाचा अधिकारी नेमण्याचा निर्णय घेतला असून या अधिकाऱ्यास अतिरिक्त मुख्य सचिवाचा दर्जा असणार आहे. मात्र, या निर्णयाला विरोध दर्शविताना शेवाळे म्हणाले, की मुंबईच्या विकासासाठी मुंबई महापालिका, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, म्हाडा यांसारख्या 16 विकाससंस्था आहेत. काँग्रेसने अशाच प्रकारची भूमिका मांडली असता भाजपा आणि सेनेने त्यास विरोध केला होता. आपत्ती काळात राज्याचे मुख्य सचिव काम पाहतात आणि महापालिका आयुक्त असताना दुस-या पदाची आवश्यकता काय, असा प्रश्न शेवाळे यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Comment