विधिमंडळ नेता निवडीचा चेंडू हायकमांडच्या कोर्टात

congress
मुंबई – राज्यातील विधिमंडळ नेता निवडीसाठी काँग्रेसच्या आमदारांची काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खर्गे आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस मोहन प्रकाश यांच्या निरीक्षणाखाली गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत विधिमंडळ नेता निवडण्याचे सर्वाधिकार काँग्रेसचे हायकमांड घेतील असा निर्णय घेण्यात आला.

आपण विधिमंडळ नेते पदाच्या शर्यतीत नसल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी सकाळी सांगितले. मात्र काँग्रेस पक्षातील अनेक जेष्ठ नेते आणि मंत्री पतंगराव कदम, बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील हे या शर्यतीत असल्यामुळे गुरुवारी झालेल्या विधिमंडळ नेता निवडीसाठी काँग्रेस आमदारांच्या बैठकीत कोणताही निर्णय होऊ शकला नाही.

Leave a Comment