आता ‘व्हॉट्स अ‍ॅप’ची ‘रीड रीसिप्ट’

whatsapp
मुंबई – लवकरच ’व्हॉट्स अ‍ॅप’ मध्ये तुम्ही पाठविलेला मेसेज समोरच्याने वाचला की नाही हे सांगणारे रीड रीसिप्ट असे नवे फीचर उपलब्ध होणार असून या नव्या फीचरची सध्या चाचणी केली जात आहे.

‘यापूर्वी पाठवलेला मॅसेज समोरच्याला मिळाल्यानंतर मॅसेजच्याच्या समोर टीक केलेले चिन्ह येत असे. त्यावरून लक्षात यायचे की, समोरच्या मॅसेज मिळाला आहे. मात्र तरीही समोरचा व्यक्ती कारण देऊ शकत होता की, माझा डेटा सुरू होता, पण मी मॅसेज पाहिला नाही. आता हे कारण देता येणार नाही. समोरच्या व्यक्तीने मॅसेज वाचल्यानंतर तुमच्या व्हॉट्सअॅप अकाऊंट समोर पूर्वी दोन टीक येणाऱ्या जागेवर आता निळ्या रंगाचे चिन्ह येणार आहे. त्यानंतर जेव्हा तो व्यक्ती मॅसेज रीड करेल तेव्हा त्या मॅसेजसमोरील ब्लू रंगाचे चिन्ह ग्रे कलरचे होईल.

Leave a Comment