माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांचे निधन

salonke
माजलगाव – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

सुंदरराव केजमधून १९६७ साली विधानसभेवर पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर १९७२ मध्ये गेवराईतून बिनविरोध निवडूल आले. सुंदरराव सोळंके हे १९७५ ते १९७८ दरम्यान कॅबिनेट मंत्री होते. शरद पवार यांनी पुलोदचे सरकार स्थापन केले त्यामध्ये ते १९७८ ते १९८० या काळात उपमुख्यमंत्री होते.