मंगळावर सापडला खनिज साठा

nasa
वॉशिंग्टन- अमेरिकेच्या रोव्हर क्युरिसिटी बग्गीला मंगळावर खनिजांचा साठा सापडला असून मंगळावर खनिज साठा सापडण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती ‘नासा’ने दिली.

मंगळावरील एका डोंगरावर क्युरिसिटी या बग्गीने ड्रिलिंग केले. तेथून लाल रंगाची पावडर सापडली आहे. या बग्गीने पावडरचे नमुने गोळा केले आहेत. या बग्गीमध्ये रसायन व खनिजांची तपासणी करणारी यंत्रणा तयार आहे. हे खनिज ‘हिमीटाइट’ नावाने ओळखले जाते. यात लोखंड आणि ऑक्साइडचे मिश्रण आहे. या खनिजांमुळे मंगळावरील प्राचीन पर्यावरणाची माहिती मिळू शकेल.

नासाने २०१० मध्ये पाठविलेल्या ‘मार्स रिकॉनसन्स’ यानात खनिजांची तपासणी करण्यासाठी खास यंत्रणा होती. या यानाने ‘हिमीटाइट’ हे खनिज असल्याचे पुरावे दिले होते.

Leave a Comment