सर्वोत्तम एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाचा मान धोनीला

dhoni
दुबई – बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रिकेट समितीचे प्रमुख व माजी भारतीय क्रिकेटपट्टू अनिल कुंबळे यांनी जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंचा एकदिवसीय आणि कसोटी संघाची घोषणा केली. यावर्षी सर्वोत्तम एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाचा बहुमान भारताच्या महेंद्रसिंह धोनीला मिळाला आहे.

चार भारतीय खेळाडूंचा आयसीसीच्या यावर्षीच्या एकदिवसीय संघामध्ये समावेश असला तरी कसोटीसंघामध्ये भारताच्या एकाही खेळाडूला स्थान मिळवता आलेले नाही. आयसीसीच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदी श्रीलंकेच्या अँजलो मॅथ्यूजची निवड करण्यात आली आहे. आयसीसीच्या एकदिवसीय आणि कसोटी संघामध्ये प्रत्येकी बारा खेळाडू आहेत. २०१४ मधील सर्व संघाची कामगिरी विचारात घेऊन, एकदिवसीय आणि कसोटी संघाची निवड करण्यात आली आहे.

महेंद्रसिंह धोनीसोबत विराट कोहली, मोहम्मद शामी यांचाही समावेश असून, सलामीवीर रोहित शर्माला बारावा खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. एकदिवसीय संघात चार भारतीय, तीन दक्षिण आफ्रिकन, दोन ऑस्ट्रेलियन, पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश आहे.

Leave a Comment