मनमोहन सिंह यांना सर्वोच्च पुरस्कार प्रदान

manmohan
टोकियो : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना राजधानी टोकियोमधील इम्पिरियल पॅलेसमध्ये झालेल्या कार्यक्रमात “द ग्रॅण्ड कॉरडॉन ऑफ द ऑर्डर ऑफ पाऊलोमनिआ फ्लॉवर” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मनमोहन सिंह यांनी भारत आणि जपान यांच्यामधील संबंध दृढ होण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा सन्मान प्राप्त करणारे मनमोहन सिंह पहिले भारतीय आहेत. या कार्यक्रमानंतर डॉ. मनमोहन सिंह हे जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांची भेट घेतली.

जपानतर्फे देण्यात येणारा हा सर्वोच्च आणि दुर्मिळ सन्मान आहे आणि तो प्राप्त करणारे मनमोहन सिंह हे पहिलेच भारतीय ठरले आहेत. जपान सरकार आणि जपानी जनतेचे प्रेम आणि आपुलकीने आपण भारावून गेल्याची भावना मनमोहन सिंह यांनी व्यक्त केली.