लक्ष्मणने केले सचिनचे समर्थन

laxman
हैद्राबाद – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याने आपल्या आत्मचरित्रात भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांच्या विरोधात केलेल्या भाष्याचे भारतीय संघाचा माजी खेळाडू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण याने समर्थन केले असून त्याने देखील माजी प्रशिक्षक यांच्या वागणुकीवर बोट ठेवले आहे. लक्ष्मणने म्हटले आहे चॅपल यांच्या कारकीर्दीत ड्रेसिंग रूममधील वातावरण दुषित झाले होते आणि सचिनने याबाबत जे काही लिहिले आहे ते योग्यच आहे. चॅपल यांच्याबाबत आणखी खुलासा समोर आला असून चॅपल यांनी लक्ष्मण याला देखील एका कसोटी सामन्यादरम्यान अशी धमकी दिली होती की तू जर डावाची सुरुवात केली नाहीस तर तुझे करियर समाप्त करीन.

Leave a Comment