स्वतंत्र विदर्भावरून शिवसेनचे शिरसंधान

uddhav
मुंबई – शिवसेनेने भाजपच्या स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेवर पक्षाचे मुखपत्र सामनामधून भाजपवर शिरसंधान साधले आहे.

मुख्यमंत्र्यांची स्वतंत्र विदर्भाची भूमिका म्हणजे आईपासून मुलास तोडण्यासारखे आहे. विदर्भाच्या मुख्यमंत्र्यांनीच महाराष्ट्र तोडण्याची भाषा करावी म्हणजे
रखवालदारानेच घोटाळा करण्यासारखे असल्याचे सामनामध्ये म्हटले आहे.

त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी अशी भूमिका मांडणे हे अखंड महाराष्ट्राच्या केशरी दुधात मिठाचा खडा टाकण्यासारखे असल्याचेही सामनातील अग्रलेखात म्हटले आहे.

राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील दौऱ्यादरम्यान विदर्भ योग्य वेळी स्वतंत्र होईल, असे म्हटले होते. मात्र शिवसेनेने मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेवर संताप व्यक्त केला आहे.

Leave a Comment