
मुंबई – जून २०१४ मध्ये झालेल्या ऑन-लाईन परिक्षेचा निकाल जाहीर झाला असून उत्तीर्ण उमेदवारांची यादी मुंबई महापालिकेच्या बेवसाइटवर जाहीर करण्यात आली आहे. जाहिरातीत लिपिकांच्या रिक्त पदासाठी प्रसिद्ध केलेल्या सामाजिक व समांतर आरक्षणानुसार सर्व मूळ शैक्षणिक प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी ९२९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. या ९२९ उमेदवारांची निवड यादी महापालिकेच्या वेबसाइटवर portal.mcgm.gov.in प्रसिद्ध करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेच्या ऑनलाइन परीक्षेचा निकाल जाहीर
त्याचप्रमाणे लिपिक पदाच्या निवडीकरता पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहण्याची दिनांक, वेळ आणि स्थळ याचा सविस्तर तपशील पत्राद्वारे कळवण्यात येईल, असं महापालिकेनं कळवलं आहे.
