सेन्सेक्स झाला २८ हजारी

share
मुंबई – आज शेअर बाजारात व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स नवा विक्रम नोंदवला असून सेन्सेक्सने १०० अंकांनी उसळी घेत २८ हजारांचा जादुई आकडा पार केला आहे. सेन्सेक्सची आजपर्यंतची ही सर्वोच्च कामगिरी आहे. सलग चौथ्या सत्रात सेन्सेक्सने सर्वोच्च आकडा गाठला आहे. शेअर बाजारात गुंतवणूकदारांना यंदा आतापर्यंत जवळापास 32 टक्के जास्त रिटर्न मिळाले आहे.

सोमवारी सेन्सेक्सने २७,९६९ या उच्चांकी स्तराला स्पर्श केला होता. बुधवारी सकाळी बाजार सुरु झाल्यानंतर बीएसईच्या सेन्सेक्समध्ये १४१.५७ अंकांची वाढ होऊन, सेन्सेक्सने २८,००१.९५ चा टप्पा गाठला. निफ्टीमध्ये ३९.५० अंकांची वाढ झाली. बजाज ऑटो, भेल, सिप्ला, आयटीसी, एसबीआय, सन फार्मा, टीसीएस, टाटा मोटर्स आणि टाटा पावर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आहे.

शेअर बाजारात भविष्यातही अशाच प्रकारच्या तेजीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ऑगस्ट २०१५ पर्यंत सेन्सेक्स ३०,३१० चा सर्वोच्च आकडा गाठेल, असे संकेत ग्लोबल रेटिंग एजन्सीने दिले आहेत.

Leave a Comment