नववर्षाच्या स्वागतासाठी कोरे हाउसफुल्ल

konkan-railway
मुंबई – नाताळ आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी कोकण आणि गोव्यात जाणारे पर्यटक सज्ज झाले असून त्यांच्या स्वागतासाठी पर्यटनविभाग देखील सज्ज झाले आहे.

नाताळ सण साजरा करण्यासाठी व नवीन वर्षाचा जल्लोष करण्याकरता मुंबईकरांनी दोन महिने शिल्लक असतानाच कोकण रेल्वेचे आगाऊ आरक्षण केले आहे. त्यामुळे २४ ते ३१ डिसेंबरला कोकण रेल्वे मार्गावरील कोकणकन्या, मांडवी व जनशताब्दी या गाडय़ा हाउसफुल्ल झाल्या असून, या गाडय़ांचे वेटिंग ३०० ते ३५० पर्यंत पोहोचले आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वेकडून कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाडय़ा चालवल्या जाणार आहेत.

Leave a Comment