सिंडिकेट बँकेची ‘सिंडमहिलाशक्ती’ योजना

syndicate-bank
मुंबई – महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सिंडिकेट बँकेने ‘सिंडमहिलाशक्ती’ ही सवलत कर्ज योजना सुरू केली असून महिला उद्योजकांना या योजनेंतर्गत पाच कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज सवलतीच्या व्याजदरात उपलब्ध होणार आहे.

यामध्ये १०.२५ टक्के या पायाभूत व्याजदराने १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज, तर त्यावरील रकमेच्या कर्जावर लागू होणा-या व्याजदरामध्ये पाव टक्का इतकी सवलत देण्यात येणार आहे.

‘सिंडमहिलाशक्ती’ योजने अंतर्गत दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज हे विनातारण मिळणार असून कर्जदार महिलांसाठी बँकेतर्फे प्रोसेसिंग आणि डॉक्युमेंटेशन फी माफ करण्यात आली आहे. बँकेचे कार्यकारी अध्यक्ष अंजनेय प्रसाद यांनी या योजनेची घोषणा केली.

Leave a Comment