२१८ वर्षे संपणार नाही एवढी बिल गेट्स यांची संपत्ती

bill-gates
नवी दिल्ली- मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स जगातील अब्जाधीशांच्या यादीत पहिल्या क्रमाकांवर आहेत. हे काही नवीन नाही पण त्यांच्याकडील पूर्ण संपत्ती संपायला २१८ वर्षे लागतील, अशी माहिती ‘ऑक्सफॅम’ या संस्थेने तयार केलेल्या अहवालातून पुढे आली आहे. जागतिक मंदीनंतर जगभरातील अब्जाधीशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याची माहिती या अहवालाने दिली आहे.

या अहवालात भारतातल्या अब्जाधीशांची संख्या ६५ असून या वर्षाच्या प्रारंभी ‘ऑक्सफॅम’ ने जगभरातील ८५ अब्जाधीशांच्या संपत्ततीची मोजदाद केली असता, त्यांच्याकडील संपत्तीचे प्रमाण हे जगातील अर्ध्या गरिबांकडे असलेल्या संपत्तीपेक्षाही जास्त असल्याचे दिसून आले होते. बिल गेट्स व वॉरेन बफे यांच्या दानशूर वृत्तीचा इतर अब्जाधीशांनी स्वीकार करावा, असे मत ‘ऑक्सफॅम’च्या अहवालात नोंदवले आहे. बिल गेट्स व वॉरेन बफे हे दोघेही विविध संस्थांचय माध्यमातून त्यांची संपत्ती सामाजिक कार्यसाठी खर्च करतात.

Leave a Comment