६७ वर्षाच्या रेल्वेमंत्र्याने केले २९ वर्षीय मुलीशी लग्न

wedding
ढाका – बांगलादेशाचे ६७ वर्षीय रेल्वेमंत्री मुजिबुल हक यांनी आपल्यापेक्षा वयाने ३८ वर्ष लहान असणाऱ्या युवतीशी लग्न केले आहे. मुजिबुल हक यांनी कोमिलाच्या चांदिना येथे आयोजित शानदार सोहळ्यात २९ वर्षीय होनुफा अख्तर रिक्ता हिच्याशी विवाहबद्ध झाले. या लग्नाची चर्चा बांगलादेशासहित विदेशातील प्रसारमाध्यमांमध्ये सुरु आहे.

हे नवविवाहित दाम्पत्य मधुचंद्रासाठी दुबई किंवा मालदीवला जाण्याची तयारी करीत असल्याची माहिती मुजीबुल यांचे मेव्हणे अलाउद्दीन मुंशी यांनी दिली.

याबाबत बांग्ला डेली या वृत्तपत्राने दिलेल्या माहिती नुसार मुजिबुल हक यांनी मागील शुक्रवारी निकाहच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली आणि मेहर म्हणून ५ लाख टका (चार लाख रुपये) दिले आहेत.

Leave a Comment