अकलूजमध्ये ७० लाखाची ‘भाग्यलक्ष्मी’ला बोली

horse
सोलापूर – आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने अकलूज येथे आयोजित घोडे बाजारात मोठया संख्येने घोडे दाखल झाले असून यात ‘भाग्यलक्ष्मी’ नामक पंचकल्याणी घोडीची किंमत तब्बल ७० लाख रूपये लावण्यात आली आहे.

देशभरातील नुखरा, पंजाब, मारवाड, काटेवाडी अशा अनेक जातींचे २६०० हून अधिक घोडे सध्या अकलूज बाजारात दाखल झाले आहेत. या घोडयांची किंमत एक लाख पासून तर २५ लाखपर्यंत आहेत. मात्र ‘भाग्यलक्ष्मी’ या घोडीची किंमत ७० लाख असल्यामुळे बाजारात या घोडीचीच चर्चा सुरू आहे.‘भाग्यलक्ष्मी’ ही पंजाबी जातीची घोडी आहे.

पुण्याचे हिरे व्यापारी विवेक शेंडे यांनी या घोडीवर ५० लाखाची बोली लावली होती. मात्र माने यांनी भाग्यलक्ष्मीला ७० लाख रूपयांपेक्षा कमी किंमतीत देण्यास नकार दिला. घोडे खरेदी करण्यापूर्वी घोड्‌याच्या पळण्याच्या, नाचांच्या स्पर्धा घेतल्या जात आहेत त्यावरूनच त्यांची खरेदी केली जाते.

Leave a Comment