वय ५४ वर्ष, मुले ३२, तरीही अर्धशतक करणारच!

halit
अंकारा – तब्बल ३२ मुलांचा बाप असलेल्या व्यक्तीला मुलांचे अर्धशतक करण्याची इच्छा आहे.५४ वर्षीय या महाभागाचे नाव हालित तकीन असे आहे.

हालित तकीन हे तुर्कीमधील दक्षिण प्रांतात राहतात. त्यांची चार लग्ने झाली असून या चारही पत्नीपासून त्यांना ३२ मुले आहेत. त्यात १२ मुले आणि २० मुली आहेत. तकीन यांच्या पहिल्या पत्नीने नुकताच एका मुलाला जन्म दिला असून अहमत असे त्याचे नाव आहे.

तुर्कीमध्ये एकपेक्षा जास्त लग्न करणे बेकायदेशीर आहे. मात्र कायदा धुडकावत हालित तकीन यांनी चार लग्न केली आहेत १९८२ साली त्यांचे पहिले लग्न झाले, त्यांनतर त्यांनी तीन लग्न केली. त्यांच्या सर्व पत्नी आणि मुले वेगवेगळया घरात राहतात कारण एकाच घरात सर्वजण राहणे अशक्य आहे. तरीही आम्ही सर्वजण आनंदी मिळून आणि मिसळून राहात आहोत, माझे सर्व मुलांवर प्रेम आहे असे ताकीन यांनी सांगितले. ‘जर मला आरोग्याने साथ दिली तर ही संख्या मला ५० पर्यंत नेण्याची इच्छा आहे’ असेही ताकीन यांनी सांगितले आहे.

Leave a Comment