
पुणे – शनिवारी संध्याकाळी दोन अज्ञात इसमांनी घरात घुसुन पुणे-सासवड रस्त्यावर हडपसरजवळच असलेल्या वडकी येथे दलित महिलेवर बलात्काराची संतापजनक घटना घडली आहे. पीडित महिला १९ वर्षाची असून विवाहित आहे.
वडकी येथे दलित महिलेवर बलात्कार
दीराचे परिवार गावी गेल्यामुळे पीडीत महिलेला दीराच्या घराचे दार उघडे दिसले त्यामुळे ती त्या घरात कोण आहे हे पाहण्यासाठी त्या घरात गेली. त्याचवेळी त्या घरात असलेल्या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार करणारे दोघे, चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेले असावे असा संशय पोलिसांना आहे.
घटना घडली त्यावेळी भारनियमनामुळे वीज गेली होती. पीडित महिलेवर सध्या ससुन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी लोणी-काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
