ऑस्ट्रेलियावर २० वर्षांनी पाकिस्तानचा मालिका विजय

pakistan
अबुधाबी – पाकिस्तानने तब्बल वीस वर्षानंतर कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा ३५६ धावांनी धुव्वा उडवत मालिका २-० ने जिंकली.

ऑस्ट्रेलियाचा डाव पाकिस्तानने विजयासाठी ठेवलेल्या ६०३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना उपहारानंतर २४६ धावांवर संपुष्टात आला. १४३ धावांवरुन डाव पुढे सुरु केल्यानंतर सामना अनिर्णीत ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलियाला तीन सत्रे खेळून काढणे आवश्यक होते. मात्र पाकिस्तानच्या फिरकी मा-यासमोर ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला.

सकाळच्या सत्रात स्टीव्ह स्मिथ (९७) आणइ मिचेल मार्शने (४७) पाकिस्तानच्या गोलंदाजीचा नेटाने सामना करत १०७ धावांची भागीदारी केली. मात्र हे दोघे बाद होताच ऑस्ट्रेलि्याचा ड़ाव कोसळला. ड़ावखुरा फिरकीपटू झुल्फीकार बाबरने ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत पाठवला. त्याने १२० धावा मोजताना पाच गडी बाद केले. पाकिस्तानने दुबईमध्ये पहिला कसोटी सामना २२१ धावांनी जिंकला होता.

Leave a Comment