रोहन मोरेनी मोलोकाई खाडी पोहून केली पार

rohan-more
पुणे – ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश असलेले सातपैकी तीन सागरी पल्ले पोहून पुण्याच्या रोहन मोरे या जलतरणपटूने खरोखरच कमाल केली आहे. हवाई येथील मोलकोई बेटावरील ४२ किलोमीटर लांब खाडी रोहनने केवळ १७ तास २८ मिनिटांत पोहून पार केली.

रोहनने २६ जुलैला १२ तास १२ मिनिटांत इंग्लिश खाडी पोहून पार केली होती. त्यानंतर सात ऑक्टोबरला त्याने १० तास १७ मिनिटांमध्ये कॅलिफोर्नियाची कॅटलिना खाडीही पोहून ओलांडली आणि आता २७ ऑक्टोबरला सात खाडयांमधील सर्वात लांब असलेली मोलकोई खाडी पोहून त्याने पूर्ण केली. मुख्य म्हणजे ही खाडी पोहणारा रोहन हा पहिलाच भारतीय ठरला आहे.

मोलकोई आणि हवाई या दोन बेटांना जोडणार्‍या या खाडीमध्ये पाण्याची खोली ७०१ मीटर असून, प्रशांत महासागरातील प्रवाहांमुळे त्यामध्ये पोहणे आव्हानात्मक ठरते. त्याचप्रमाणे या खाडीत जलचर मोठया प्रमाणावर आहे. तसेच खाडीमध्ये विविध टप्प्यांवर वाढणारे तापमान हे देखील मोठे आव्हान असते. आतापर्यंत ५२ जणांनी ही खाडी पोहण्याचा प्रयत्न केला असून त्यात केवळ ३५ जणांनाच यश आले आहेत.

Leave a Comment