नाथाभाऊंना मिळाला विठ्ठलाच्या महापूजेचा मान

eknath-khadse
मुंबई – येत्या ३ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी असून त्यानिमित्त पंढरपूर येथे करण्यात येणा-या विठ्ठलाच्या महापूजेचा मान यंदा एकनाथ खडसे यांना मिळाला आहे. १९९५ पासून उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते कार्तिकी एकादशीची पूजा केली जाते. मात्र, यावर्षी उपमुख्यमंत्र्याची घोषणा झालेली नसल्याने पंढरपूरच्या विठ्ठल रूख्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पूजेचे निमंत्रण देण्यात आले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान खडसेंना बहाल केला.

फडणवीस यांनी हा मान मुख्यमंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्या खडसे यांना बहाल केल्यामुळे येत्या ३ नोव्हेबर रोजी पहाटे २.३० वाजता खडसे यांच्याहस्ते विठ्ठल-रूख्मिणीची पूजा होणार आहे.

Leave a Comment