राज ठाकरे यांनी केले जाधव कुटुंबियांचे सांत्वन

raj
अहमदनगर – पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा गावात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज दुपारी एकच्या सुमारास जाधव कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. राज ठाकरे हे तासभर जवखेडेत थांबले होते. यावेळी राज यांनी जाधव कुटुंबियांशी संवाद साधला. तसेच यामागे कोणाचा हात असू शकतो याची विचारपूस केली. सुमारे तासभर चर्चा केल्यानंतर राज यांनी जाधव कुटुंबियांच्या मागे मनसे ठामपणे उभी राहील असे सांगत तेथून नगरकडे प्रयाण केले.

अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून जाधव कुटुंबातील आई, वडील व मुलगा धारदार शस्त्राने वार करून या तिघांची हत्या केली होती. आरोपी माहीतगार असल्याचा पोलिसांचा संशय आहे. कारण दोन दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने जाधव यांच्या वस्तीवरील कुत्र्याला मारले होते. पोलिसांनी काहींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे मात्र अद्याप यातून काहीही ठोस माहिती पुढे आलेली नाही.

Leave a Comment