
कराची – पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या हत्येप्रकरणी पाकिस्तान पोलिसांनी तेहरिक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे.
बेनझीर भुट्टो यांच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक
केंद्रीय अन्वेषण विभागाचे पोलिस अधीक्षक उस्मान बाव्जा यांनी दिलेल्या माहितीनुसार जमशेद खान उर्फ खुटकी आणि मोहम्मद आबीद उर्फ अब्दुल्ला अशा या दोन संशयितांची नावे आहेत. यांना कराचीतील गार्डन भागातून अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या दोघांनी या हत्याकांडाबद्दल महत्त्वपूर्ण खुलासे केले आहेत. बेनझीर भुट्टो यांच्या रॅलीमध्ये करण्यात आलेल्या आत्मघाती हल्ल्यात 115 नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर, 200 हून अधिकजण जखमी झाले होते.
