स्वस्त झाले सोने आणि चांदी

gold
मुंबई – आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचे दर वधारल्यामुळे सोने आणि चांदीच्या मागणी घट झाली. याच्या परिणामस्वरूप सोने ४०० तर चांदी ५०० रूपयांनी स्वस्त झाली आहे.

सोन्याच्या दरात ४०० रूपयांची घट झाल्याने सोन्याचा प्रति तोळा दर २७,१०० इतका खाली आला आहे. तर, चांदीच्या दरात ५५० रूपयांची घट झाल्याने एक किलो चांदीसाठी आता ३७,८५० मोजावे लागणार आहेत. गेल्या महिन्याभरातील सोन्याच्या दरात झालेली ही सर्वात निच्चांकी घट आहे.

Leave a Comment