‘अ‍ॅपल’ कंपनीचा सीइओ समलिंगी

team-cook
न्यूयॉर्क – एका मासिकाच्या लेखाने संगणक आणि मोबाईल क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. हा लेख होता संगणक व मोबाइल क्षेत्रातील बलाढय ‘अ‍ॅपल’ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) टीम कूक यांच्यावर. या लेखाला कुक यांनी दुजोरा दिला असून आपण समलिंगी असल्याची कबुली दिली.

मी समलिंगी असल्याची जाहीर कबुली यापूर्वी आपण सगळ्यांसमोर दिली नव्हती. पण समलिंगी असण्याचा मला अभिमान आहे. ही देवाने मला दिलेली देणगीच असल्याचे मी मानतो, असेही कूक पुढे म्हणाले. या लेखात कूक यांनी आपण मार्टिन लूथर किंग यांच्या पासून प्रेरणा घेतल्याचे म्हटले आहे. ‘आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की आपण दुस-यांसाठी काय करतो’ या किंग यांच्या सुप्रसिद्ध वाक्याचा उल्लेख कूक यांनी केला आहे.

Leave a Comment