चोरडिया आत्महत्येला वेगळी कलाटणी

ajay-choradia
पुणे – २७ ऑक्टोबरला पुण्यातील आपल्याच हॉटेलमध्ये पंचशील ग्रुपचे चेअरमन अजय चोरडिया यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती, पण आता त्यांच्या आत्महत्त्येच्या मागे आशिष शर्मा नावाची व्यक्ती असल्याचे उघड झाल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. ह्याबाबतचा खुलासा चोरडिया यांनी आत्महत्येवेळी लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे झाला आहे. पण हा आशिष शर्मा कोण याबाबत पोलिसांकडून कोणताही माहिती देण्यात आलेली नाही.

पंचशील ग्रुपचे चेअरमन अजय चोरडिया यांनी पिंपरी चिंचवड शहरातील स्वतःच्या ‘डबल ट्री’ या हॉटेलात आत्महत्त्या केली होती. पोलीस तपासात एक सुसाईड नोट आढळून आली. यामध्ये माझ्या आत्महत्त्येला आशिष शर्मा जबाबदार असून मी त्याला पाच कोटी रुपये आणि बाणेरपरिसरामध्ये एक फ्लॅट दिला होता. त्याने मला खुप त्रास दिला असून, त्याला सोडू नका. त्याचबरोबर त्यांनी आपल्या देहदानाचा उल्लेख देखील या नोटमध्ये केला आहे.

दरम्यान, या घटनेला दोन दिवस उलटले तरी पोलीस तपासात कोणताही प्रगती झाल्याचे दिसत नाही. या प्रकरणात पोलिसांवर दबाव असल्याचे समजते.

Leave a Comment