शिवसेनेच्या स्वाभिमानावर भाजपचा घाव

combo
मुंबई – अफझल खानाच्या फौजेशी शिवसेनेने तुलना केल्यामुळे, भाजप चांगलीच आक्रमक झाली असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांची माफी मागावी, अशी मागणी करणारी बातमी एका इंग्रजी वृतपत्राने दिली आहे. भाजपने शिवसेनेला सत्तेत सहभागी व्हायचे असेल, तर उद्धव ठाकरेंना झुकावेच लागेल, अशीच काहीशी भूमिका घेतली आहे.

उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपवर घणाघात केला. महाराष्ट्र जिंकण्यासाठी दिल्लीतून अफझल खानाच्या फौजा येत आहेत, असा उद्धव ठाकरेंनी अमित शाह आणि भाजपवर घणाघात नाव न घेता केला होता. उद्धव ठाकरेंच्या या टीकेमुळे भाजपचा चांगलाच तिळपापड झाल्यामुळेच भाजपने आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना झुकवण्याचे ठरवले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेमुळे आम्ही नाराज असल्यामुळे त्याची जाणीव त्यांना व्हायला हवी अशी आमची इच्छा आहे, असे भाजपने म्हटले असल्यामुळे या वक्तव्यांबद्दल त्यांना माफी मागावी लागेल, या मतावर भाजप ठाम आहे.

Leave a Comment