महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्र्याच्याविरोधात 22 गुन्हे !

devendra
मुंबई – एडीआर या संशोधन संस्थेने दिलेल्या अहवालानुसार एक धक्कादायक माहिती समोर आली असून या माहितीच्या अनुसार महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही राजकीय़ स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

मागील काही दिवसांपूर्वीच अशी बातमी आली होती कि महाराष्ट्रातील नवनिर्वाचित २८८ आमदारांपैकी ५७ टक्के आमदारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. या यादीत महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्र्याचाही समावेश असल्यामुळे फडणवीस यांचा यापुढचा प्रवास मात्र खडतर असणार आहे. कारण त्याच्यांवर राजकीय स्वरूपाचे २२ गुन्हे दाखल आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर एक-दोन नव्हे तर तब्बल २२ गुन्हे दाखल असल्याची माहिती या रिपोर्टनुसार समोर येत असून याबाबतचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. या बातमीनुसार एडीआर या संशोधन संस्थेने याबाबतचा अहवाल जाहीर केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या व्यतिरिक्त विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आलेल्या भाजपच्या १२२ पैकी ७४ आमदारांविरोधात गुन्हे दाखल आहेत. यापैकी ५३ आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

Leave a Comment